शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची बैठक पुण्यात
उपसमिती तयार करण्याची पवारसाहेबांची सूचना...
पुणे
दि. ६ मार्च –
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे आज पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्यायविभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुणे झाली. या बैठकीचे आयोजन प्रदेश सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केले होते.
या बैठकीला अठरापगड जातीचे पदाधिकारी उपस्थित होते. वेगवेगळ्या समाजातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रश्न पवारसाहेबांनी ऐकून घेतले. त्यानंतर या समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी एक उपसमिती तयार करण्याची सूचना पवारसाहेबांनी दिली.
या वेगवेगळ्या समाजाच्या समस्या राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.
सदरच्या बैठकीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व प्रमुख कार्यकर्ते हजर होते. त्यामध्ये माजी आमदार जयदेव गायकवाड, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, पंडित कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, मच्छिंद्र भोसले,तुकाराम साळुंखे, गौतम कदम, शैलेंद्र जाधव, रमेश राक्षे, अंकल सोनवणे, अनंत कांबळे,अजय गायकवाड, लक्ष्मण सुरनर,विजय खंडाळे, गोरक्ष लोखंडे आदी मान्यवरांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.