करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबईच्या नालेसफाईला मार्च 2023 च्या पहिल्या आठवड्यात सुरुवात

भाजपा आमदार. अँड आशिष शेलार यांच्या प्रश्नावर विधानसभेत माहिती

मुंबई, दि. 28

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांकरिता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
असून, सदर कामे मार्च, 2023 च्या पहिल्या आठवडयात सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार
पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबईतील नालेसफाईच्या कामांच्या निविदांना विलंब झाल्याकडे लक्ष वेधत भाजपा आमदार अँड आशिष शेलार, पराग अळवणी, तमिल सेलवन यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की,
मुंबईतील नालेसफाईची पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे नियमितपणे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात.
तथापि, नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नालेसफाईची किरकोळ स्वरुपाची कामे पावसाळ्यात करण्यात येतात.

बृहन्मुंबईतील शहर, पूर्व व पश्चिम विभागातील मोठे व छोटे नाले तसेच पूर्व व पश्चिम
द्रुतगती महामार्गावरील विविध छोटे/मोठे नाले, पेटीका नाले तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व मिठी
नदीमधील गाळ काढण्याच्या कामांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण ३१ निविदा मागविण्यात
आल्या असून, सदर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सदर कामे मार्च, 2023 च्या पहिल्या आठवडयात सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार
पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button