करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मराठीची अनेक दालने आपली वाट पाहत आहेत

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार

मुंबई:

मराठी भाषा समृद्ध असून संत, पंत वाङमयाची दालनं मोठी आहेत. ती दालनं आजही आपली वाट पाहत आहेत. सरकार म्हणून जबाबदारी आहेच, पण आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. चला ही दालनं वाचू, उघडू, समजून घेऊ, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार. अँड आशिष शेलार यांनी मुलुंडच्या कार्यक्रमात केले.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी, शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा मुंबईच्यावतीने ‘मराठी भाषा – गौरव दिन’ मुलुंड,.बोरिवली आणि विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला होता.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते
यावेळी विविध क्षेत्रांतील ६ मान्यवरांचा सत्कार आला. मुलुंड
पूर्व येथील मराठा मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या निमित्ताने ‘स्वरतरंग’ मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर आला.

 

भाजपा माजी गट नेते प्रभाकर शिंदे यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा मुंबई अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार, खा. मनोज कोटक, आ. मिहीर कोटेचा आदी उपस्थिती होते.
कार्यक्रमात रमेश शिर्के, योगाचार्य कृष्णाजी कोर्टी, सुकृत खांडेकर, डॉ. कुशल सावंत, डॉ. रोहन प्रधान, कुमार सोहोनी या सहजणांचा सन्मान करण्यात आला.

तर आमदार मनिषा चौधरी यांनी बोरिवली येथे भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर आमदार अँड पराग अळवणी यांच्यातर्फे “मधुरव” हा अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button