भाजपा मुंबईच्या वतीने सोमवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’
मुंबई :
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा मुंबईच्यावतीने ‘मराठी भाषा – गौरव दिन’ सोमवार ता.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५ वा. मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळाच्या सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘स्वरतरंग’ मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील ६ मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे अशी माहिती भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा मुंबई अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार, खा. मनोज कोटक, आ. मिहीर कोटेचा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात रमेश शिर्के, योगाचार्य कृष्णाजी कोर्टी, सुकृत खांडेकर, डॉ. कुशल सावंत, डॉ. रोहन प्रधान, कुमार सोहोनी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.