Uncategorizedकरमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये – जयंत पाटील

पुणे दि. २१ फेब्रुवारी –

MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची जयंत पाटील यांनी सोमवारी भेट घेतली.

हा विषय अतिशय गंभीर असून दिवसरात्र अभ्यास करून मुले परीक्षेची तयारी करत आहेत. अचानक अभ्यासक्रमात होणारा बदल हा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button