करमणूकमहाराष्ट्रमुंबई
Trending

आज शिवजयंती निमित्याने माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या माणगाववाडी येथील आदीवासी शाळा व वसतीगृहाला भेट देण्याचा योग आला.

तस तर भेट वरच्यावर होतच असते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गरजेच्या वस्तूंच नियोजन करणे हे नित्याच व आवडत काम. Charity Starts From Home…. ही उक्ती सार्थ करणे तेव्हढे सोप नाही. ह्या आदीवासींच्या उथ्थापनासाठी कार्य सूरू केल आणि लक्षात आल, की ह्या क्षेत्रात काम कराव तितक थोड आहे. प्रमोद करदिकरांसारख्या ईश्वरतूल्य व्यक्तीकडून प्रेरणा घेवून शक्य तितका वेळ ह्या कामासाठी देण हे परम कर्तव्य झाल आहे. ज्यांचा माझ्याकार्यप्रणाली वर आणि सचोटीवर विश्वास आहे अश्या संस्थांना ह्या कामात मदत करण्यासाठी उत्तेजन देणे हा जणू माझ्या विहीत कामकाजाचा भागच बनला आहे.

शाळेत साधारण ७०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी ४६० विद्यार्थी वसतीगृहात रहातात. आजच्या घडीला शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची दुसरी पिढी शिक्षण घेत आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी आदीवासी समाजातील आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा ह्या साठी तेथिल शिक्षक वर्ग कठोर मेहनत करत आहेत. सध्या शाळेला प्रोजेक्टरची गरज आहे. विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेवून काही सामाजिक संस्थांना विनंती करायची आहे व कमीत कमी २ प्रोजेक्टर शाळेला उपलब्ध करून द्यायचे आहेत.
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन’ ह्या वचना नूसार कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता रंजल्या गांजलेल्यांना मदत उपलब्ध करून देण ही काळाची गरज आहे.

‘कोणी निंदो कोणी वंदो’ आपण आपल कर्म करत रहायच. आज आपण वयाच्या अश्या टप्प्यावर पोहोचलो आहोत की, मागे वळून बघणे अनिवार्य आहे. मागे वळून बघताना लक्षात येत की, ज्या समाजाचा आपण घटक आहोत त्या समाजाचा एक महत्वाचा घटक मागे राहीला आहे. तर मग एक जबाबदार व सूज्ञ नागरीक म्हणून आपली जबाबदारी आहे ह्या मागे राहीलेल्या वंचितांना हात देवून पूढे आणण्याची. स्वत:चीच तूंबडी एन केन प्रकारे भरणे, म्हणजे जन्म सार्थकी लागला हि शिकवण उपजतच मिळालेली नाही. त्याला अपवाद असण्याचं बाळकडू मिळालेले. त्यामुळे आपण समाजाच देण लागतो व ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाची परतफेड ह्याच जन्मात व्हायला हवी, अन्यथा जन्म वाया गेला..

आज संस्थेचे संस्थापक सदस्य गायकवाडदादा यांचा ७५ वा वाढदिवस. शिवाजी महाराज व माझा जन्मदिवस एकच ह्याचा आनंद ह्या ७५ वर्षाय तरूणाच्या चेह-यावरून ओसंडून वहात होता. वाढदिवसाप्रित्यर्थ गायकवाड दादांनी आजूबाजूच्या ७५ वृध्द आदिवासी महिलांना साड्या वाटल्या.

पुढची भेट ह्या आदीवासी मुलासोबत होळीच्या दिवशी. मुलांसाठी खास बेत पुरणाचीपोळी व कटाची आमटी. कोणी तरी दाता भेटतोच.

लेखिका
सुवर्णा खंडेलवाल-जोशी
चैरिटी उपायुक्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button