मुंबई( नासिकेत पानसरे):
विक्रोळी कन्नमवार नगर येथील डंपिंग ग्राउंड जटिल प्रश्न सोडविणारच असा विश्वास विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी व्यक्त केले. विक्रोळी पोलीस ठाण्यात डंपिंग ग्राउंड बाबत स्वर्वपक्षिय बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी डंपिंग प्राधिकरणाचे अधिकारी श्रीनिवास सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला दिशा वेल्फेअर ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बेरिशेट्टी, कन्नमवार नगर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राहुल वाघधरे, माजी शाखाप्रमुख शंकर उर्फ नाना धमाले, ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आदेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विक्रोळी आजूबाजूचा कांजूरमार्ग, भांडुप आदी परिसर डंपिंग ग्राउंड मुळे त्रस्त आहे व जनतेत नाराजीच वातावरण आहे.