मुंबई गुन्हे शाखेने 47 हजार किमतीच्या प्रतिबंधित ई-सिगारेटसह दोन आरोपींना अटक केली
श्रीश उपाध्याय/
मुंबई
मुंबई गुन्हे शाखा 10 ने 47 हजार किमतीच्या प्रतिबंधित ई-सिगारेटसह दोन आरोपींना अटक केली आहे.
गुन्हे शाखा 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांना काही लोक प्रतिबंधित ई-सिगारेटची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 47 हजार रुपयांच्या ई-सिगारेट जप्त केल्या. या प्रकरणी गुन्हे शाखेने सतीश पुजारी आणि शिवसिंग बल्ला या दोन आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, पोलिस उपायुक्त (प्र-१) कृष्णकांत उपाध्याय यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई
गुन्हे शाखा 10 चे प्रभारी
पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने केली आहे.