मुंबई गुन्हे शाखेने आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला
आयटी इंजिनिअरचा जीव वाचला
श्रीश उपाध्याय/
मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच 5 ने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आयटी इंजिनिअरला पकडून त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
इंटरनेटवर कोणीतरी आत्महत्येचे मार्ग शोधत असल्याची माहिती गुन्हे शाखा 5 ला इंटरपोलच्या माध्यमातून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जोगेश्वरी येथे राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याला पकडून चौकशी केली. चौकशीत असे आढळून आले की, सदर व्यक्तीने कर्ज घेतले होते आणि कर्जाची परतफेड न केल्यामुळे तो अस्वस्थ होऊन इंटरनेटवर आत्महत्येचा सोपा मार्ग शोधत होता. गुन्हे शाखेने या तरुणाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई
गुन्हे शाखा 5 चे प्रभारी
पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांचे पथकाने केली आहे.