काँग्रेसची गरिबांच्या प्रति मानसिकता दिसून येते
-आमदार अँड आशिष शेलार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करताना त्यांनी पान टपरीवाल्यासारखे भाषण केले असा उल्लेख केला. काँग्रेसकडून कधी चहावाल्यांची, कधी पान टपरीवाल्यांचे खिल्ली उडवली जाते तेही समाजाचे घटक आहेत, यातून काँग्रेसची सर्वसामान्य माणसाविषयीची आणि गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता दिसून येते.
रोहित पवार यांना राजकीय कावीळ
आमदार रोहित पवार यांनी ट्विटर वरून केलेल्या टिकेला उत्तर देताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळे जग पिवळ दिसतं. ज्या गोष्टींवर रोहित पवार आज बोलत आहेत त्या घटना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडल्या आहेत. तेव्हा खुद्द मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते. अगदी ते मा. शरद पवारांनाही भेटत नव्हते. विकास कामे होत नसल्याने, निधी मिळत नसल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. एकंदरीत परिस्थिती पाहता रोहित पवार यांना राजकीय कावीळ झाली आहे.
संजय राऊत यांचा दुतोंडी भूमिका घेण्यात विश्वविक्रम
खा.संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे औरंगाबादचे नामांतर करण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. संजय राऊत यांचा दुतोंडी भूमिका घेण्यात विश्वविक्रम आहे. उस्मानाबादचे धाराशिव करण्याची पहिली मंजुरी केंद्र सरकारने दिली होती. औरंगाबादचेही लवकरच नामांतर होईल. सत्ता गेल्यामुळे संजय राऊत यांची फडफड सुरू आहे.