बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबई – भांडुप मध्ये चायनीज सेंटरला भीषण आग

मुंबई - भांडुप मध्ये चायनीज सेंटरला भीषण आग

भांडुप मधील छत्रपती शिवाजी महाराज तलाव परिसरातील दुर्गा चायनीज सेंटर या हॉटेलला पहाटे आग लागली.पहाटे सहा वाजताच्या दरम्यान ही आग लागली आणि काही क्षणात आगीचं रौद्ररुप पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button