Uncategorizedकरमणूकपुणेबातम्यामुंबईलाईफस्टाईल
Trending

आज दिनांक 10 व उद्या 11 फेब्रुवारी रोजी भाजपची नाशकात प्रदेश कार्यकारणी

नाशिक –

दि.10 व 11 फेब्रुवारी रोजी भाजपची नाशकात प्रदेश कार्यकारणी संपन्न होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस विजय चौधरी व विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ही पत्रकार परिषद नाशिक महानगराची बैठक वसंतस्मृती, भा.ज.पा. कार्यालय, नाशिक येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, नाशिक ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत दोन दिवसात संपन्न होणाऱ्या विविध सत्रांची सविस्तर माहिती दिली
लोकसभा प्रवास,स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बिजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोदणी, डेटा व्यवस्थापन , युवा वॉरीयर्स, सोशल मीडिया व त्याचा वापर व विधानसभा प्रवास आदी विषयांवर या विषयांचे पदाधिकारी आढावा सादर करतील व त्याबाबतची संभाव्य दिशा या वेळी ठरविण्यात येईल.

दुसऱ्या दिवशी विविध सादर केलेल्या निवेदनावर विस्तृत चर्चा होईल व यावर मान्यवरान तर्फे मार्गदर्शन होईल राजकीय तसेच कृषी क्षेत्रासह विविध विषयांवर ठराव पारित होतील

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे, नामदार गिरीष महाजन केंद्रीय संघटन मंत्री बी एल् संतोष , केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे ,केंद्रीय मंत्री नामदार भारती पवार , नामदार कपिल पाटील, नामदार भागवत कराड, नामदार रावसाहेब दानवे यांचेसह केंद्राचे महाराष्ट्रातील मंत्री, तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे सह महाराष्ट्रातील सर्व भाजप मंत्री हजाराहून अधिक पदाधिकारी या बैठकीस येणार असून राज्यातील खासदार, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, कोअर कमिटी सदस्य आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभुमिवर नाशिक शहरातील रस्त्यांचे व चौकाचौकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे

अधिवेशनाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असून या कामे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकले आमदार सीमाताई हिरे, विजय साने, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे महिला मोर्चा अध्यक्षा हेमगौरी आडके , दिनकर अण्णा पाटील ,संतोष नेरे, योगेश मैंद, अविनाश पाटील ,आदिसह प्रदेश पदाधिकारी तसे नाशिक शहरातील पदाधिकारी आघाड्यांचे पदाधिकारी मोर्चाचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत या वेळी यावेळी भोजन व्यवस्था निवास व्यवस्था सभा मंडप व्यवस्था वाहन व्यवस्था चहापाणीवस्था शहर शुशोभिकरण आदी साठी ५०० हून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत ही कार्यकारणी एक इतरांसाठी आदर्श ठरांवा या साठी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नामदार गिरीष महाजन व विभागीय संघटन मंत्री व प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे विशेष लक्ष ठेवून आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button