केंद्रीय संसदीय समितीमार्फत अडाणी समूहाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही व्हावी – नसीम खान
ठाणे एलआयसी कार्यालयाबाहेर अडाणी विरुद्ध कॉँग्रेसचे जोरदार प्रदर्शन
मुंबई
आज महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील एलआयसी कार्यालयासमोर अडाणी समूहाच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले की, या देशातील सर्वसामान्य जनतेच्या विश्वासार्ह असलेल्या एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर वित्तीय संस्थेमध्ये गुंतवणूक केलेला पैसा केंद्रातील सरकारच्या दबावमुळेच अडाणी समूहात गुंतवणूक केला. हिडणबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अडाणी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झालेला आहे, त्यामुळे देशाची बदनामी सुद्धा होत आहे. मोदी सरकारने ताबडतोब एक केंद्रीय संसदीय समिती गठित करून अडाणी समूहाच्या सर्व कंपनीची सखोल चौकशी करावी व दोषीवर कठोर कार्यवाही करण्याची जोरदार मागणी नसीम खान यांनी प्रदर्शनाच्या वेळी केली.
या प्रदर्शनात ठाणे शहर जिल्हाध्यक्ष एड. विक्रांत चव्हाण, प्रदेश प्रतिनिधि श्री. मनोज शिंदे यांच्या सह युवक, महिला व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचे प्रदर्शन आज राज्याच्या सर्व जिल्ह्यात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यालयाबाहेर करण्यात येत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले.