करमणूकभारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई गुन्हे शाखेने पाच लाखांच्या गुटख्यासह दोन आरोपींना अटक केली

श्रीश उपाध्याय

मुंबई

मुंबई क्राईम ब्रँच 11 ने 5 लाख रुपयांचा गुटखासह दोन आरोपिना अटक केली आहे.
मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात टेम्पोमध्ये बंदी असलेला गुटखा भरून कोणीतरी आणणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 11 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी राहुल दास आणि हवालदार लाल पटेल यांना 4 लाख 99 हजार 200 रुपयांच्या गुटख्यासह अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीस सह आयुक्त(गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखा 11चे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button