Uncategorizedकरमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

चांदिवली मतदार संघातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी मनपा उपायुक्त यांच्या दालनात नसीम खान यांची बैठक

चांदिवली मतदार संघातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी मनपा उपायुक्त यांच्या दालनात नसीम खान यांची बैठक

श्रीशउपाध्याय

मुंबई

चांदिवली मतदार संघात मागील ४-५ वर्षापासून रखडलेल्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी मनपा उपायुक्त परीमंडळ ५ यांच्या दालनात मा. मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक घेतली.

चांदिवली मतदार संघात कुर्ला अंधेरी रोड (साकीनाका ते बैल बाजार) रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सन २०१८ पासून वारंवार निर्णय करूनही वेळेत पूर्ण न झाल्याने होणारा ट्राफिक जाम, साकीनाका परेरवाडी येथील झुंजार क्रीडा मैदानात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत, चांदिवली फार्म रोड ते शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया येथील प्रस्तावित DP रोड अर्धवट काम पूर्ण करणेबाबत आणि DP ९ मनुभाई चाळ ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जोडणारा रस्त्यांची रुंदीकरण व दुरुस्तीकरण करणेबाबत, सफेद पूल नाल्यावरील पूल आणि अशोक नगर मारवा येथील हिंदू स्मशानभूमी जवळील पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत तसेच 90 फूट मनीषा हॉटेल ते अंधेरी घाटकोपर लिंक रोड पर्यन्त रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवून रस्ता मोकळा करणेबाबत, संघर्ष नगर मधील शाळेची इमारत मनपाच्या ताब्यात घेऊन ९ व १० वीचे वर्ग सुरू करण्याबाबत तसेच रस्ता दुरुस्ती आणि दिवा बत्तीची व्यवस्था करणेबाबत, चांदीवली मतदार संघात दत्तक वस्ती योजना प्रभावीपणे राबवून घेऊन जागोजागी पडलेल्या कचऱ्याचा ढिग वेळोवेळी साफ करणेबाबत तसेच संस्थेने माहिती व संपर्कासह नाम फलक लवण्याबाबत, तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याबाबत अशा आणि इतर अनेक विषयावर चर्चा झाल्यावर उपायुक्त श्री हर्षद काळे यांनी लवकरात लवकर वरील सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला नसीम खान यांच्या सह मनपा परीमंडळ ०५ चे उपायुक्त श्री हर्षद काळे, मनपा एल विभाग सहायक पालिका आयुक्त श्री. महादेव शिंदे, कार्यकारी अभियंता श्री राठोड, मनपा एल विभागातील मेंटनन्स विभागाचे श्री. राठोड, इमारत दुरुस्ती विभागाचे श्री. वाकले, अनुज्ञापण विभागाचे श्रीमती जवळकर, उद्यान विभागाचे श्री. एरनाक, रस्ते विभागाचे श्री. गवळी, घन-कचरा विभागाचे श्री. कळंबे तसेच वाहतूक विभागाचे श्री. जाधव, प्रदूषण विभागाचे श्री. हिरवाळे यांच्या सह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button