अमरावतीऔरंगाबादकरमणूकनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अकरा आमदार आणि दोन खासदारांना पाठवल्या बांगड्या

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अकरा आमदार आणि दोन खासदारांना पाठवल्या बांगड्या

सोलापूर –

सोलापूर मध्ये उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अकरा आमदार आणि दोन खासदारांना बांगड्या पाठवल्या आहेत. लाकडी-निंबोडी योजनेच्या माध्यमातून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द झालेला असताना त्याचे टेंडर काढल्याने पाणी संघर्ष समिती हे आक्रमक झाले आहेत. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील गावांना 5 टीएमसी पाणी देण्याची योजना आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना रद्द झाल्याचं पत्र सत्ताधारी आमदारांनी दाखवले होते , मात्र टेंडर रद्द झाले असेल तर आज पुन्हा टेंडर निघाले कसे? असा सवाल उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग घेणार असून आमच्या जिल्ह्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही संघर्ष करणार. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की बारामतीची भूक भागत नाही मग आज तुम्ही जलसंपदा मंत्री झाल्यावर टेंडर कसे काय निघाले?

ही योजना रद्द न झाल्यास भाजपला येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदाच्या निवडणुकात याचे परिणाम भोगावे लागतील असा भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांचा देवेंद्र फडणीस यांच्या पक्षाला इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button