अमरावती –
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. त्यांचे संपूर्ण 17 उमेदवार विजयी झाले आहे. प्रतिस्पर्धी श्री शिवाजी पॅनलला खातेही उघडता आले नाही. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एक संचालक पूर्वी अविरोध झाल्याने 16 जागांसाठी काल 34.14 टक्के मतदान झाले होते.सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीला सुरवात झाली तर रात्री 8.30वाजता अंतिम निकाल झाला,तब्बल 12 तासाच्या मतमोजणी सर्व निकाल जाहीर झाले,
निकाल जाहीर होताच प्रगती पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष केला. गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी झाली.