Uncategorizedकरमणूकक्राईमनागपूरपुणेबातम्यामहाराष्ट्र
Trending

आम्ही महापुरुषांच्या रक्तात जन्माला आलो नाही,

पण आम्ही महापुरुषांच्या विचाराचे वारस आहोत - अमोल मिटकरी

अकोला –

राज्यामध्ये सध्या संभाजी राजांचा मुद्दा सध्या गाजत असताना बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अमोल मिटकरी यांना उद्देशून मला संभाजी राजांची यांचा काही संबंध नाही यांच्या घराण्याचा काही संबंध नाही त्यामुळे त्यांनी संभाजी राजांवर काही बोलू नये. अशी टीका संजय गायकवाड यांनी अमोल मिटकरी वर केली आहे. तर यावर मिटकरी म्हणतात की जर कोणाचं आडनाव गायकवाड असेल तर त्यांनी संभाजी राजे यांच्या सैन्यातील सैन्यांसोबत आपला संबंध जोडू नये.आणि संजय गायकवाड माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मी त्यांचा आदर करतो. आम्ही शांत आहे.मला शांत राहू द्या. तुमच्यासारखी पातळी सोडून बोलण्याची परंपरा आमच्या पक्षात नाही.तर माझे हिंदुत्व हे सर्व धर्म समभावाच आहे. संभाजी राजे स्वराज्य रक्षक होते आणि आहेत आणि स्वराज्य रक्षक राहतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे विदर्भातील चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते त्या ठिकाणी त्यांनी आज दर्ग्यावर जाऊन चादर सोडली आणि दर्शन घेतल्याने हा विषय सध्या चर्चेला आला असून एकीकडे भाजपही मुस्लिमांच्या विरोधक पार्टी म्हणून बघितले जाते तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमांची टोपी नाकारतात. तर त्यांच्याच पक्षाचे नेते दर्ग्यावर चादर चढवत असतील तर हे हिंदुत्व आम्हालाही आवडलं.त्यामुळे आता भाजपला मुस्लिमांची मत घ्यायची आहेत आणि चंद्रपूरची लोकसभा त्यांना पाहिजे आहेत त्यामुळे आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांना घेऊन गेल्याने मी त्यांचा अभिनंदन करतो आणि वरच्याला एक विनंती करतो की इनकी झोली भरदो.झोली पसारके आपके सामने आयेथे..इनकी झोली भरदो. म्हणतात एक कव्वाली गात भाजपला टोला लगावला आहे.

बाईट : अमोल मिटकरी ( आमदार राष्ट्रवादी )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button