रेस्टोरंट चालकांची वाहतूक कोंडी झाल्यास होणार कारवाई ; पोलीस उपायुक्तांचा इशारा
रेस्टोरंट चालकांची वाहतूक कोंडी झाल्यास होणार कारवाई ; पोलीस उपायुक्तांचा इशारा
सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकीकडे मुंबईकरांनी जय्यत तयारी सुरू असताना शहरात दोन वर्षाच्या नंतर होणाऱ्या सेलिब्रेशन मध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी ही आपली तयारी सुरू केली आहे. त्यात थर्टी फस्ट सेलिब्रेशनसाठी हॉटेल, रेस्टोरट आणि धाब्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. प्रत्येक जण आपली वाहने घेउनच सेलिब्रेशनसाठी जाणार असल्याने हि वाहने रस्त्यावर पार्क केल्यास त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने सेलिब्रेशनसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगसाठी संबधित हॉटेल, धाबे आणि रेस्टोरंट चालकांनी सुविधा करावी. हि वाहने रस्त्यावर उभी केल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधित हॉटेल, धाबे आणि रेस्टोरंट चालकावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.