अहमदनगरकरमणूकमहाराष्ट्र

कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरन परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज

कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरन परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज

निसर्ग भंडारदरा सज्ज पंढरी म्हणुन आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या भंडारदरा पर्यटन क्षेत्रामध्ये नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. भंडारदरा धरणाचा जलाशय व माळरानावर विद्युतरोषणाईसह विविध रंगी बेरंगी कापडी तंबुंची कमान उभी राहिली आहे.अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील वर्षाऋतू म्हणजे निसर्गाचा खास अविष्कार पर्यटकांसाठी अविस्मरणीय असतो डिसेंबरमध्ये सुट्टीचे औचित् भंडारदऱ्याच्या निसर्गात दाखल होऊ लागले आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदऱ्यातील टेन्टधारक हॉटेल व्यावसायिक निरनिराळे फंडे वापरत पर्यटकांना आकर्षित करत आहेत.धरणाच्या जलाशयाच्या कडेला टेन्ट उभारले जात असून इच्छुक टेन्टमध्ये राहण्यास असणाऱ्या पर्यटकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध होत असल्याने टेन्टला प्रतिसाद देत असले तरी अनेक पर्यटक हॉटेल्समध्ये मुक्कामी राहून भंडारदऱ्याच्या निसर्गाचाही मनमुराद आनंद लुटत आहेत.अनेक टेन्टधारक व हॉटेलधारक पर्यटकांना नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य टेन्टच्या दरामध्ये विशेष सवलत देत आहेत. तर पर्यटकांना विशेष पॅकेजमध्ये हॉटेल्सधारकांनी विशेष सवलत दिली आहे. अनेक हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.शनिवारी व रविवारी तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असल्याने नवीन वर्षासाठी शिखरावर जाण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती दिसत आहे.अलंग-कुलंग-मलंग या गडकिल्ल्यांवरही साहसी पर्यटक नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात हजर होणार आहेत. भंडारदरा धरणाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, सांदणदरी, अमृतेश्वर मंदिर, भंडारदरा धरणातील बोटींगही पर्यटकांचे असणार आहे. राजूर पोलीस स्टेशन चे वतीने स पो नि. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली चोख बंदोबस्त ठेवणेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button