महाराष्ट्र
Trending

शिंदे गटाची ऑफर; मात्र सतिश घाडगे पाटलांचा भाजपात प्रवेश

शिंदे गटाची ऑफर; मात्र सतिश घाडगे पाटलांचा भाजपात प्रवेश

परभणी लोकसभा आणि जालन्यातील घनसावंगी विधान सभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व या मतदार संघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी जालन्यातील समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन सतिष घाटगे पाटील यांना भाजपात प्रवेश देऊन मोठी ताकद या मतदार संघात उभी करण्याचा प्रयन्त सुरू केला आहे.विधान सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभेला शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात दोन साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या घाडगे पाटील यांच्या प्रवेशाने या मतदार संघात भाजपच्या पाठीमागे घाटगे पाटील यांच्या रूपाने मोठी ताकद मिळाली आहे. या मतदार संघावर आपलं वर्चस्व निर्माण व्हावं म्हणून शिंदे गटाकडून ही मोठे प्रयन्त सुरू होते.समृद्धी गणेश फेस्टिव्हल च्या कार्यक्रमा दरम्यान शिंदे गटाचे उपनेते मा. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी चक्क कार्यक्रमा दरम्यानच सतिष घाटगे यांना शिंदे गटात येण्याचं जाहीर आमंत्रण दिले होते.त्यामुळे घाटगे शिंदे गटात जातील अशी शक्यता वर्तविली जात होती.त्यांतच काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समृद्धी शुगर इंडस्ट्रीजच्या समृद्धी विकास परिवर्तन पॅनल ने पहिल्याच प्रयत्नात घनसावंगी विधान सभा मतदार संघात २१ ठिकाणी पॅनल उभे करून १३ ठिकाणी सरपंच पदाच्या धुरा सांभाळत विजय मिळवल्यानें प्रस्थापित राजकीय नेत्यांना मोठा धक्का दिला आहे.त्यामुळे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानसभा आणि लोकसभा मतदार संघात मोठी ताकद निर्माण करण्याच्या दृष्टीने शिंदे गटाला धक्का देत घाडगे यांचा भाजपात प्रवेश करून घेत अत्ता पासूनच या विधान सभा आणि लोकसभा मतदार संघावर आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी साखर कारखानदार असलेल्या घाडगे पाटील यांना प्रवेश दिल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदार संघात मोठी खेळी खेण्याचा डाव भाजपचा असल्याच्या चर्चाना ही या प्रवेशाने उधाण आलं आहे.आता या मातब्बर व वजनदार नेत्यास भाजप कडून परभणी लोकसभा की घनसावंगी विधानसभेची उमेदवारी दिली जाते हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button