अंबरनाथमध्ये कंपनीतील दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू
अंबरनाथमध्ये कंपनीतील दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू
आनंदनगर एमआयडीसीत असलेल्या या कंपनीत पाईपलाईन कंट्रोलसाठी वापरले जाणारे प्रेशर कंट्रोल वॉल तयार केले जातात. या कंपनीत 28 वर्षीय श्रीकांत सुरेश कदम हा कर्मचारी काम करत होता. आज संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास श्रीकांत हा कंपनीत काम करत असताना प्रेशर कंट्रोल वॉलमध्ये हवा भरून त्याची चाचणी केली जात असताना अचानक हा वॉल फुटला आणि त्याचं झाकण श्रीकांतच्या अंगावर उडालं. या दुर्घटनेत श्रीकांत हा गंभीर जखमी झाला, तर अन्य दोन कामगारही जखमी झाले. या तिघांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे श्रीकांत याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. यातील मयत श्रीकांत कदम याला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.