ठाकरे सरकारने बिल्डर, बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा – भाजपा नेते आमदार अँड.आशिष शेलार
ठाकरे सरकारने बिल्डर, बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा - भाजपा नेते आमदार अँड.आशिष शेलार
नागपूर, दि. 20
कोरोना काळात ठाकरे सरकारने बिल्डर बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
मुंबईतील मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला त्याबाबत मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. या विधेयकाला पाठिंबा देत आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारचे अभिनंदन केले.
कोरोना काळात ठाकरे सरकारने हाँटेल ताजला दंड माफ केला, बिल्डरांना प्रिमियम मध्ये सुमारे 10 हजार कोटींची सुट दिली. तसेच हाँटेल, पब, बार यांना परवाना शुल्लकात 50% सवलत दिली. तशीच सूट होर्डिंग्जवाल्यांना दिली. विदेशी दारुवरील कर 50% माफ केला. एकिकडे शिंदे- फडणवीस सरकारने सामान्य मुंबईकरांना मालमत्ता करात सुट देऊन सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला तर कोविड काळात ठाकरे सरकारने धनदांडग्यांवर सवलतींंची खैरात केली. रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ही सूट देत असल्याचे त्यावेळी सरकारने सांगितले होते, मग आता या सगळ्या सवलती मुळे किती रोजगार मिळाला? बिल्डरांनी प्रिमियम मध्ये सवलत घेतली, स्टँप ड्युटी मध्ये सूट घेतली मग याचा सामान्य मुंबईकरांना किती फायदा झाला? मालमत्तांचे दर किती कमी झाले? या सगळ्याची चौकशी करुन याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.