पायाखालची वाळू सरकल्यानेच लोकांना वेठीस धरून महामोर्चा काढला – खासदार डॉ श्रीकांत शिंदे
पायाखालची वाळू सरकल्यानेच लोकांना वेठीस धरून महामोर्चा काढला – खासदार डॉ श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील ५ महिन्यात विकासाचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यामुळे विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच लोकांना वेठीस धरून महामोर्चा काढले जात असल्याची टीका आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चावर खासदार डॉ एकनाथ शिंदे यानी कल्याणात महाराष्ट्र शासन आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात केली टीका. २१५२ तरुण तरुणीना प्राथमिक नियुक्तीपत्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि खासदार डॉ शिंदे यांच्या हस्ते कल्याण मध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात १०० पेक्षा जास्त छोट्या मोठ्या नामांकित कंपन्यांनी ऑन द स्पॉट नोकरीचे स्टोल उभारले होते. जवळपास ६ हजार तरुणांनी नोकरीसाठी अर्ज करत आपले नशीब आजमावले. तर मेळाव्याच्या व्यासपीठावर २१५२ तरुण तरुणीना प्राथमिक नियुक्तीपत्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि खासदार डॉ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. विरोधकांना दुसरे काम उरलेले नाही. सकाळी उठले कि शिव्या द्यायच्या, टीका करायच्या हेच काम आहे. सत्ता गेल्यावर माणूस कसा फडफडतो, विरोधकांना दुसरे काम उरलेले नाही. सकाळी उठले कि शिव्या द्यायच्या, टीका करायच्या हेच काम आहे. सत्ता गेल्यावर माणूस कसा फडफडतो, तडफडतो याचे हे चांगले उदाहरण….तुमच्या दिवसाची सुरुवात वाईट करताच मात्र लोकांच्या दिवसाची सुरुवात सुद्धा वाईट गोष्टी पासून का करता. सरकार चांगल काम करत आहे. गेल्या ५ महिन्यात अनेक लोकहिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. यात शेतकऱ्याच्या, ज्येष्ठ नागरिकाच्या, युवकाच्या हितासाठी आज रोजगार मेळावा घेतला आज विरोधाभास पाहायला मिळतो आहे. जिथे लोकांना वेठीस धरून मोर्चे काढले जातात.त्याच ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना नोकर्या देण्याचे काम मोठ्या संख्येने आपण करत आहोत. आजच्या दिवशी चांगले मोठे काम आपण केले आहे. हजारो तरुणांना यातून नोकरी मिळणार आहे.