महाराष्ट्रमुंबई
Trending

महाविकास आघाडीचा शिंदे सरकार विरुध्द हल्ला बोल मोर्चा

महाविकास आघाडीचा शिंदे सरकार विरुध्द हल्ला बोल मोर्चा

मुंबई दि. १७ डिसेंबर : – भाजपाकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे आणि लोकशाहीचे रक्षण आदी मुद्द्यावर आज महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षासह महाविकास आघाडी सोबत असलेले सर्व घटक पक्ष, पुरोगामी संस्था, संघटनानी भायखळाच्या रिचर्डसन्स क्रूडास कंपनी ते टाईम्स ऑफ इंडिया प्रेस सीएसएमटी स्थानकापर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला.

या मोर्चात विरोधी पक्षातील सर्वच प्रमुख नेते शिवसेनेकडून श्री. उद्धव ठाकरे, श्री. सुभाष देसाई, श्री. संजय राऊत, श्री. विनायक राऊत, श्री. अनिल परब, श्री. अंबादास दानवे, श्री. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्री. शरदचंद्र पवार, श्री. अजितदादा पवार, श्रीमती. सुप्रिया सुळे, श्री. जयंत पाटील, श्री. छगन भुजबळ, श्री. दिलीप वळसे-पाटील श्री. जितेंद्र आव्हाड, तसेच काँग्रेसकडून श्री नानाभाऊ पटोळे, श्री. बाळासाहेब थोरात, श्री. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व मा.मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, श्री. भाई जगताप यांच्यासह समाजवादी पक्षाचे श्री. अबू असीम आजमी, शेतकरी संघटनेचे श्री. जयंत पाटील तसेच इतर घटक पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि शेकडो लोकांनी सहभाग घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button