कल्याण मध्ये आढळला ऍलबिनो कुकरी नावाचा दुर्मिळ जातीचा साप
कल्याण मध्ये आढळला ऍलबिनो कुकरी नावाचा दुर्मिळ जातीचा साप
कल्याण लाल चौकी परिसरात दुर्मिळ ऍलबिनो कुकरी जातीचा साप निघाल्याने घरातली सदस्यांची एकच घबराट सर्पमित्राने रेस्क्यू करत सापाला दिले जीवदान दोन फूट लांबिचा हा साप रंगहिन असून इतर साप मध्ये विविध रंग असतात मात्र या सपात रंग येत नाही त्यामुळे या सापाला ऍलबिनो कुकरी असे नाव असून कल्याण डोंबिवली परिसरात पहिल्यांदाच आढला आहे .
कल्याण मधील लाल चौकी परिसरात राहणाऱ्या कुटूंबाच्या घरात सोमवारी ५ डिसेंबर रोजी घरातील व्यायाम करणाऱ्या साहित्यच्याखाली दुर्मिळ जातीचा ऍलबिनो कुकरी जातीचा साप निदर्शनास आला.हा साप रंग हिन असून इतर साप मध्ये विविध रंग असतात मात्र या सपात रंग येत नाही त्यामुळे या सापालाऍलबिनो कुकरी असे नाव असून हा साप लाखोत एखादा आढळून येत असून कल्याण डोंबिवली परिसरात पहिल्यांदाच आढल्याने या सापाला सर्पमित्र पार्थ आणि रेहान यांनी रेस्क्यू करत वनविभागाकडे सुपूर्द केले .हा बिनविषारी दुर्मिळ जातीचा साप असून जवळपास दोन फूट लांब असल्याची माहिती सर्प मित्र पार्थ पाठारे कडून सांगण्यात आले.