CHANDRAPUR – T- 40 वाघीण जखमी ; शिकार करण्यास सक्षम ;दोन बछड्यासह कॅमेरात कैद
CHANDRAPUR - T- 40 वाघीण जखमी ; शिकार करण्यास सक्षम ;दोन बछड्यासह कॅमेरात कैद
T – 4 वाघीण जखमी असून ती शिकार करण्यास सक्षम नाही. तसेच वाघिणीचे दोन बछळे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचा बातम्या माध्यमात प्रकाशित झाल्या होत्या.वनविभागाने वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.आपल्या दोन बछल्यासह वाघीण आढळून आली.वाघिणीच्या डाव्या पायाचा दुखापत झाली असून ती लंगडत चालताना कॅमेरात कैद झाली आहे. यावेळी तिच्यासोबत दोन बछडे होते.T – 4 वाघीण 14-15 वर्षे वयाची आहे. वाघीणीसोबत 14-15 महिन्यांचे एक नर तर एका मदी बछडे आहेत ला वाघीनीने पाळीव गायीची शिकार केली.4 डिसेंबरला वाघिणीचे रानडुकराची शिकार केली.शिकारीच्या ठिकाणी वाघीनीचे छायाचित्र सुध्दा वनविभागाला प्राप्त झाले आहे. वाघीणीचा वावर पांगडी बफर क्षेत्र व कोअर क्षेत्रात नियमितरित्या आढळून येत आहे .वनपरिक्षेत्र अधिकारी , प्राथमिक बचाव दल ( PRT ) व ईतर क्षेत्रीय वनकर्मचारी वाघीणीचा हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. वाघीणीला पायाची दुखापत झाली असली तरी नियमित हालचाल व ईतर नैसर्गिक वागणूक सुरु असल्याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ.जितेंद्र रमागवकर सांगितले आहे.वाघिणीला जेरबंद करण्याची सध्या गरज नसली तरी आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाईल असं म्हटले आहे.