बातम्यामहाराष्ट्र
ब्रेक फेल होऊन एसटी थेट शेतात; चालकामुळे ८० प्रवासी सुखरूप
ब्रेक फेल होऊन एसटी थेट शेतात; चालकामुळे ८० प्रवासी सुखरूप
मोहोळ शहरानजीक सातारा – वैराग राज्य महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले.अशा स्थितीत चालक दिगंबर शिंदे यांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे एसटी बसमधील तब्बल ८० प्रवाश्यांचे प्राण वाचले आहेत.’देव तारी त्याला कोन मारी’ याचाच प्रत्यय या घटनेमधून आला आहे.