वांद्रे- वर्सोवा सागरी सेतूच्या खार परिसर कनेक्टरची पाहणी आमदार अँँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा
वांद्रे- वर्सोवा सागरी सेतूच्या खार परिसर कनेक्टरची पाहणी आमदार अँँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा
मुंबई, दि. 4
खार दांडा येथील श्रीराम मंदिर जेटीलगत टाकण्यात आलेल्या जुहू कनेक्टर
परिसराची पाहणी शनिवारी भाजपा नेते आणि स्थानिक आमदार अँड आशिष शेलार यांनी एमएसआरडीसी अधिकारी आणि स्थानिक कोळी बांधवांसोबत केली
वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाचा
खार दांडा येथील श्रीराम मंदिर जेटीलगत जुहु कनेक्टरचा बोया टाकण्यात आला आहे. हा मार्ग कोळी बांधवांच्या बोटींचा दळणवळणाचा मार्ग असल्यामुळे एमएसआरडीसीने या समस्या सोडवण्यासाठी पर्यांयाचा विचार करावा, अशी मागणी स्थानिक कोळी बांधवांनी केली होती. याबाबत वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प व्यवस्थापक आणि कोळी बांधव यांची संयुक्त बैठक आमदार अँड आशिष शेलार यांनी शुक्रवारी घेतली. वरिष्ठ अधिक्षक अभियंता
डि. डि. बारावकर, कँप्टन खारा आदी अधिकारी उपस्थितीत होते.
या बैठकीला दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्था, दांडा कोळी समाज, खार दांडा कोळीवाडा गावठाण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक कोळी बांधवाच्या समस्या लक्षात घेऊन एमएसआरडीसीने पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
कोळी बांधवांचे म्हणणे काय आहे हे अधिकाऱ्यांना समजावे यासाठी शनिवारी अधिकारी, कोळी बांधव यांच्या सोबत आमदार अँड आशिष शेलार यांनी परिसराची पाहणी केली. देवयानी वैद्य, नितीन पोरे, शाम भिका आदी समाजाचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
दरम्यान, प्रकल्प वेळेत पुर्ण होणे आवश्यक असून प्रकल्प होताना कोळी बांधवांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वंकष विचार अधिकाऱ्यांनी करावा अशा सूचना यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी दिल्या.