किल्ले प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनानिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
किल्ले प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनानिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्ती आणि शौर्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेला 363 वा शिवप्रताप दिन किल्ले प्रतापगडावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करणयात आला. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर हा शिवप्रताप दिन मोठ्या आनंदात आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये प्रथमच साजरा होत असल्याने सर्व शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. शिवप्रताप दिनाच्या उत्सवासाठी आदल्या रात्रीपासूनच किल्ले प्रतापगडावर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर लेझर शो देखील दाखवून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या इतिहासाला देखील उजाळा देण्यात आला आज सकाळपासूनच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने किल्ले प्रतापगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख या दोन्ही अधिकाऱ्यांच्या हस्ते हे कार्यक्रम पार पडले तर शिवप्रताप दिनाचा मुख्य कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा केली व मुख्य बुरुजावर भव्य अश्या भगवा ध्वजाचे अनावरण करणयात आले दरवर्षी प्रमाणे यंदा ही हेलिकॉप्टर च्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली प्रथमच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याची मुभा दिल्याने यंदा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरा करण्यात आला त्यामुळे सर्वच शिवभक्तांच्यात नवचैतन्य पाहायला मिळाले शिवप्रताप दिन सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी चौक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.