वर्ध्याच्या आर्वीत लतादीदींचा अवलिया फॅन ; चक्क मंदिर तयार करून माता सरस्वतीप्रमाणे पूजन
वर्ध्याच्या आर्वीत लतादीदींचा अवलिया फॅन ; चक्क मंदिर तयार करून माता सरस्वतीप्रमाणे पूजन
वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लतादीदींचा एक अवलिया फॅन आहे राजीव देशमुख असं त्यांचं नाव आहे आणि अगदी बालपणापासूनच लतादीदींच्या गाण्यांचे त्यांना अतिशय वेड आहे.त्यामुळे लतादीदी स्वर्गवासी झाल्यानंतर लतादीदींना स्वर देवतांचा दर्जा देत लतादीदिंच्या पहिल्या जयंतीदिनी घरात चक्क मंदिरच बनवलं आहे.त्यात दिदींची मूर्ती असून फुल वाहून पूजाही केली जाते.लतादिदींच्या गाण्यांचं देशमुख यांना इतकं वेड आहे की त्यांच्या घराच्या भिंतीवर दिदींचे अनेक फोटो आहेत.एवढंच नाही तर स्वतःच्या लग्नाच्या पत्रिकेत देखील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो लवायलाही ते विसरले नाहीत. देशमुख यांचा लतादीदींना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न एकदा अपयशी ठरला होता त्यानंतर त्यांनी परत एकदा लतादीदींची भेट घेतलीच आणि त्यांना जग जिंकल्यासारखं वाटलं..तो फोटोही त्यांनी अगदी जपून ठेवलाय.राजीव देशमुख यांच्या पत्नी शुभांगी देखमुख यांनी लतादीदींचे सरस्वती देवीच्या रुपात पोस्टर तयार केले आहेय.घरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल असे हे पोस्टर आहे..त्यानंतर एक दुःखद घटना त्यांच्या कानावर पडली ती म्हणजे लतादीदी स्वर्गवासी झाल्याची. लतादीदींच्या जाण्यानंतर त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ चक्क मंदिरच बनवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं हे पहिलंचं मंदिर म्हणावं लागेल.