बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महाराष्ट्रातील सरकारमध्ये कोणाचा तरी छुपा पाठींबा असल्याशिवाय कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात येणार नाही- संजय राऊत

महाराष्ट्रातील सरकारमध्ये कोणाचा तरी छुपा पाठींबा असल्याशिवाय कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात येणार नाही- संजय राऊत

कर्नाटक प्रकरणावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काय वाटतं त्यांना ते विचारलं पाहिजे.
ज्या दोन मंत्र्यांना सीमा भागातलं काम दिलेला आहे ते त्याबद्दल काय करणार आहेत हे त्यांना विचारलं पाहिजे.
कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात येतात व झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारच्या पाठिंबा शिवाय होणार नाही व यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी पाठिंबा असणार.
यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
महाराष्ट्रात घुसलेले कर्नाटकी लोक परत जाण्यासाठी किंवा कर्नाटकची लढण्यासाठी परत आसाम ला जाऊन प्रार्थना करणार आहेत की काय
या सरकारला महाराष्ट्राचा अभिमान नाही त्या सरकारकडून महाराष्ट्राचा संरक्षण होणार नाही
आमच्या काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंडे फडकवावे व काश्मीर आमचा आहे म्हणावं अशा पद्धतीने हे महाराष्ट्रात घुसलेले आहेत
अशा लोकांच्या विरोधात राज द्रोहचे गुन्हे दाखल करावे
2018 मध्ये केलेल्या विधाना वरती आता गुन्हा दाखल करत आहेत. पण नोटीस पाठवत आहे
यावर देखील सरकारने भूमिका स्पष्ट करावी.
हे सरकार महाराष्ट्रात आल्यावर नंतर महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत.
काश्मीर फाईल या चित्रपटात एका पक्षाचा प्रचार दिसत आहे व त्यामध्ये एका पक्षाची बाजू घेतलेली आहे
या चित्रपटानंतर कश्मीरमध्ये सर्वात जास्त पंडितांवर हल्ले झालेले आहेत
केंद्र सरकार ला विनंती आहे की त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर असे राजकारण करू नये.
महाराष्ट्र घाबरणारा नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button