पाणी आणि वायू प्रदूषणाविरोधात खारघर मधील नागरिकांची निषेध रॅली
पाणी आणि वायू प्रदूषणाविरोधात खारघर मधील नागरिकांची निषेध रॅली
नवी मुंबई –
खारघर मधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पर्यावरण प्रदूषण आणि प्रदूषित पाण्याच्या संदर्भात निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला. तर खारघर जवळ असलेल्या तळोजा एमआयडीसी मधून अनेक केमिकल कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात खराब पाणी, धूर सोडले जाते त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होते, तर वातावरणाची गुणवत्ता खराब झाली असून, यामुळे नागरिकांना अनेक रोग राईला सामोरे जावे लागते, मात्र याकडे स्थानिक प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.
अनेक तक्रारी करूनही काहीच ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे आमचे संरक्षण आम्हीच करावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्याची वेळ आली असल्याने आज निषेध रॅली काढून निषेध व्यक्त केला. या रॅलीत लहान मुलांसह जेष्ठ आणि तरुण मंडळी सामील झाल्याचे पाहायला मिळाले. या रॅलीतून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे