पैशासाठी स्वतः च्या मुलाची विक्री; खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या मुलांना दत्तक दिल्याचा बनाव
पैशासाठी स्वतः च्या मुलाची विक्री; खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या मुलांना दत्तक दिल्याचा बनाव
स्वतःच्या मुलांना दत्तक दिल्याचा बनाव करून त्यांची खोट्या कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याची धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला असून दत्तक देणारे आई- वडीलांना नागपुर पोलिसांनी अटक केली असून मूल विकत घेणाऱ्या दाम्पत्यास भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. योगेंद्रकुमार प्रजापती (30), रिता योगेंद्रकुमार प्रजापती (29) दोघे रा. अजंतापुरा, खुंटातालाब, कोटा, राजस्थान असे कळमना पोलिसांनी अटक केल्याच्या मुलाच्या आई वडिलांचे नाव असून मूल विकत घेणाऱ्या इंदू सुरेंद्र मेश्राम आणि त्यांचा पती सुरेंद्र मेश्राम असे भंडारा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची नाव आहे.
विव्हो नागपूर जिल्ह्यातील कळमना पोलिसांच्या तपासात हा संपुर्ण प्रकार उघडकीस आला आहे।योगेंद्रची पत्नी रिता ही पाचव्यांदा गर्भवती असल्याने ती प्रसूतीसाठी जून महिन्यात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होती. या दरम्यान मुलंबाळ नसलेल्या मेश्राम दाम्पत्याचे नातेवाईक रुग्णालयात भरती होते, त्याचवेळी त्यांची ओळख झाली। प्रजापती दाम्पत्याला मेश्राम दाम्पत्याने त्यांचे एक मुलं दत्तक देण्याची विनवणी केली। त्यावरून योगेंद्र व रिता यांनी दीड वर्षीय सनी नावाचा मुलगा मेश्राम दाम्पत्याला विकल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, दत्तकनामा करताना योगेंद्र प्रजापती यांनी बनावट नावाने कागदपत्र तयार केल्याची गंभीर बाब पोलीस तपासात समोर आली आहे।आता चार ही दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 464,465, 370 आणि 34 कलमानुसार गुन्हा नोंद असून चार ही आरोपि भंडारा आणि कळमना(नागपुर) पोलिसांच्या ताब्यात आहे।तर विक्री झालेलं बाळ आता भंडारा येथील बाल उदय इथं ठेवण्यात आले असून भंडारा पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.