गोवरच्या आजारांमुळे १२ बालकांचा मृत्यू झाला असून सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी- माझी आरोग्यमंत्री राजेश टोपे
गोवरच्या आजारांमुळे १२ बालकांचा मृत्यू झाला असून सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी- माझी आरोग्यमंत्री राजेश टोपे
नाशिक, मालेगाव व आता औरंगाबाद पर्यंत गोवर पसरल्याची माहीती आपल्याकडे उपलब्ध असून जवळ जवळ १२ बालके मृत्युमुखी पडली आहेत. सरकारनी खुप गांभीर्याने या बाबी घ्यायला हव्या,१२ मृत्यू झाले याचा अर्थ परिस्थिती गंभीर बनतेय.सरकारनी ताबडतोब कार्यवाहीची आवश्यकता असल्याचं माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.गोवर पासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती महत्वाची असून जनजागृती,लसीकरण व योग्य उपचार या त्रिसुत्रीचा वापर करून या गोवर वर नियंत्रण करता येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी आज दिली.ते जालन्यात बोलत होते.लोकांनी गोवरच्या प्रतिबंधासाठी काय करावं आणी गोवर झाल्यावर काय काळजी घ्यावी याची जगजागृती सर्वात प्रथम करायला हवी. त्या संदर्भातील माहीती सर्व माध्यमातून,पत्रके काढून लोकांना दयायला पाहीजे, कारण हा आजार संसर्गजन्य असून हवेतून पसरतो.व्हायरल असून एका मुलाला झाला की आजूबाजूच्या मुलांनाही होऊ शकतो. त्यामुळे याबाबत जनजागृती अतिशय महत्त्वाची असल्याचं टोपे म्हणाले.जीथे गोवरचे रुग्ण आढळतील त्याना इतरांपासून वेगळे ठेवायला पाहीजे.त्याच बरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण ही गरजेचे आहे. लॉकड़ाउन मध्ये जर काही बालके गोवरच्या लसीकरणा पासून वंचीत राहीलेली असतील तर त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ९ वा महिना व १५ वा महिन्यात मुलांचे लसीकरण करणे आवश्यक असते. त्यानंतर ५ वर्षापर्यंत दर सहा महिन्यांनी A व्हिटॅमिन चा डोस देणे आवश्यक असते. मुलांना गोवर पासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, लसीकरण व उपचार या त्रिसूत्री चा वापर करणे आवश्यक असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगीतले. गोवरचा विळखा वाढत असून या साठी सर्वांगीण लसीकरण कॅम्प उभारण्याचे उपाय करावेत असेही ते म्हणाले.