युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी घेतली भेट
युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी घेतली भेट
डोंबिवली पश्चिमेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घ्यावे
युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट.डोंबिवली पश्चिमेतील पाणी पुरवठा नियोजन करण्यासाठी नवी जलवाहिनी टाकण्यात यावी अशी मागणी बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.
युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आज आयुक्त दांगडे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी शहरातील विविध विषयावर आयुक्तांसोबत चर्चा केली. या प्रसंगी युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक मोहन उगले आदी उपस्थित होते. डोंबिवली पश्चिमेतील जुन्या विष्णूनगर पोलिस स्टेशनमोरील मच्छी मार्केट काम मार्गी लावण्यात यावे. डोंबिवली घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चन यांच्या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे. घरो घरी पाईप लाईनद्वारे गॅस पोचविण्यासाठी डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणा:या पुथ थ्रु गॅस वाहिनी टाकण्याच्या कामाला गती द्यावी. शहर सौंदर्र्यीकरण आणि स्वच्छतेच्या कामासाठी महापालिकेने विशेष मोहिम हाती घ्यावी. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या योजनाचा टप्पा दोन हा कल्याण डोंबिवसाठी तयार करुन तो सरकार दरबारी मंजूरीकरीता पाठविण्यात यावा याकडे म्हात्रे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.