आदिवासी पावरा समाजाच्या न्याय हक्का साठी जय मातृभूमी पक्ष रस्त्यावर उतरणार – भुपेश बाविस्कर
आदिवासी पावरा समाजाच्या न्याय हक्का साठी जय मातृभूमी पक्ष रस्त्यावर उतरणार - भुपेश बाविस्कर
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मांडवे दिगर या पाड्यावर आदिवासी पावरा समाजातील सुमारे 100 कुटुंब रहिवास करत आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही हा पाडा मूलभूत गरजांसह शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. आदिवासी बांधवाच्या न्याय हक्का साठी जय मातृभूमी पक्ष 22 नोव्हेंबर रोजी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर एल्गार संविधान मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे अँड. भुपेश बाविस्कर यांनी म्हटले आहे. एकीकडे देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र आजही मांडवे दिगर पाड्यावरील आदिवासी पावरा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, मुलांच्या शिक्षणासाठी शाळा नाही, त्यांच्या कडे आधारकार्ड, मतदान कार्ड रेशनकार्ड नसल्याने शासकीय योजना मिळत नाही. या निषेधार्थ आदिवासी पावरा समाजात न्याय मिळण्यासाठी मातृभूमी पक्षाच्या वतीने 22 नोव्हेंबर रोजी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर एल्गार संविधान मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या एल्गार संविधान मोर्चा हजारोंच्या संख्येने आदिवासी पावरा कुटुंबासह जय मातृभूमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे अँडव्होकेट भुपेश बाविस्कर यांनी म्हटले आहे.