नवी मुंबईतील कोपर खैरणे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली यात एका गटातील व्यक्ती ठार झाली असून दोन जण गंभीर जखमी झाले तर दुसऱ्या गटातील दोन जण जखमी झाले.याबाबत
रूहान शेख आणि बंदी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती,त्यात बंदी यास मारहाण झाली होती,त्याचच राग मनात धरून बंदी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने वरील ठिकाणी हल्ला केला,दोन्ही बाजूने तुंबळ हाणामारी झाली असता,रुहान याने आपल्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने बंदी आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर साथीदारांवर हल्ला करत,साथीदार नसीर शेख यांच्या छातीवर चाकू भोसकून त्याला ठार केले तर इतरांना मारहाण केली,त्याचवेळी दुसऱ्या बाजूने लाकडी बांबू,बॅटने हल्ला करून त्यांच्या डोक्यात,हातावर आणि पायावर जोरदार प्रहार करून जीवघेणा प्रयत्न केला असता त्यात दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.दोन्ही बाजूच्या पाच आरोपीना अटक केली असून यातील तीन आरोपी अजूनही रुग्णालयात उपचार घेत असून,उर्वरित तळोजा तुरुंगात अटक आहेत.पोलिसांनी मात्र सिगारेट अंगावर पडला म्हणून मारामारी झाल्याचे सांगितले..