बातम्यामहाराष्ट्र
Trending
गाडण्याची आणि मारण्याची भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती असू शकत नाही
गाडण्याची आणि मारण्याची भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती असू शकत नाही
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना गाडून टाकू असं वक्तव्य केलं होतं.. या नंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत गाडण्याची आणि मारण्याची भाषा ही गोडसे यांचीच असू शकते असं वक्तव्य करत देवेंद्र फडणीसांवर टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री गाडण्याची भाषा करत असतील तर ही लोकशाही नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस