राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी मध्ये झालेल्या प्रकारची चौकशी पोलिसां मार्फत वाव्ही – शैलेंद्र तिवारी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी मध्ये झालेल्या प्रकारची चौकशी पोलिसां मार्फत वाव्ही - शैलेंद्र तिवारी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जनसंवाद विद्या विभागात(मास कम्युनिकेशन) कार्यरत वादग्रस्त प्राध्यापकाने विद्यापीठातील विविध विभागांत कार्यरत सात प्राध्यापकांना लैंगिक शोषणाच्या खोट्या तक्रारींच्या आधारे फसवण्याची भीती दाखवून तब्बल 16 लाख रुपये खंडणी स्वरूपात वसूल केल्याची गंभीर आणि तेवढीचं धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. धर्मेश धावनकर असे प्राध्यापकाचे नाव असून त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क विभाग प्रमुख पदाची जबाबदारी देखील आहे. या प्रकरणाचा वाचा फुटल्यानंतर कुलगुरू सुभाष चौधरी यांनी प्राध्यापक धर्मेश धावनकरकडून पीआरओ पदाची जबाबदारी काढून घेतली असून नोटीस बजावली आहे. 16 नोव्हेंबर पर्यत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या सात प्राध्यापकांनी धर्मेश धावनकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे,त्यांच्यामध्ये लोक प्रशासन विभागाचे प्रमुख जितेंद्र वासनिक, प्रवास पर्यटन विभागाचे प्रभारी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अशोक बोरकर, ग्रंथालय शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सत्यप्रकाश इंदूरवाडे, जीवनरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.वीरेंद्र मेश्राम आणि मराठी विभागाचे डॉ शैलेंद्र लेंडे यांचा समावेश आहे. सातही प्राध्यापकांनी कुलगुरू,राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे प्राध्यापक धर्मेश धवनकरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण:-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कार्यरत धर्मेश धवनकर इतर प्राध्यापकांना मी लैंगिक समस्या निवारण कमेटीचा सदस्य आहे आणि तुमच्या विरोधात लैंगिक शोषणाची एक तक्रार प्राप्त झाली असल्याची भीती दाखवत होते. मी कुलगुरूंसह समितीत असलेल्या इतर अधिकाऱ्यांच्या अगदी जवळचा असल्याने हे प्रकरण निस्तरण्यासाठी तुमची मदत करू शकतो. मात्र,त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील. अन्यथा तुमची अब्रू आणि नोकरी धोक्यात येईल अशी भीती दाखवून प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी सात प्राध्यापकांकडून तब्बल 16 लाख रुपये खंडणी स्वरूपात वसूल
केले.
लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश:-
धर्मेश धवनकर यांच्याशी संबंधित पुन्हा नवीन प्रकरण समोर येताचं नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी धवनकर यांना नोटीस बजावली असून दोन दिवसात लेकी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशी समिती नेमणार:-
कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले आहे. या घटनेमुळे विद्यापीठाची प्रतिमा मालिन होत असल्याने त्यांनी सखोल चौकशीचे आदेश निर्गमित केले आहे. 16 नोव्हेंबर पर्यंत प्राध्यापक धर्मेश धवनकरला लेखी उत्तर कुलगुरूंकडे करावे लागणार आहे. उत्तर असमाधानकारक असल्यास विद्यापीठाकडून चौकशी समिती नेमली जाणार असल्याची माहिती नागपूर विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी दिली आहे.नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी मध्ये झालेला प्रकारची चौकशी पोलिसांचा मार्फत वाव्ही व लवकरात लवकर वाव्ही या मागणी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज कुलगुरू याना निवेदन दिले.