भारत जोडो यात्रेसाठी धुळे शहरातून दोन हजार कार्यकर्ते रवाना
भारत जोडो यात्रेसाठी धुळे शहरातून दोन हजार कार्यकर्ते रवाना
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी धुळे जिल्ह्यातून दोन हजाराहून अधिक कार्यकर्ते आज सकाळी वाशिम च्या दिशेने रवाना झालेत, शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयातून कार्यकर्ते वाशिम च्या दिशेने रवाना झालेत, यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थित यांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या वाशिम जिल्ह्यात आली असून या यात्रेला राज्यासह देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, या भारत जोडो यात्रेसाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते आज वाशिम च्या दिशेने रवाना झालेत शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयापासून कार्यकर्ते वाशिम च्या दिशेने निघाले आहेत. यावेळी एस.एस.व्ही.पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यावेळी खानदेश ची संस्कृती असणाऱ्या आदिवासी नृत्यने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.. वाशिम येथे रात्री नऊ वाजता राहुल गांधी हे धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून यावेळी तीन हजाराहून अधिक कार्यकर्ते वाशिम च्या दिशेने रवाना झाले.