नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या दरात विक्रमी वाढ,गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट दरवाढ
नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या दरात विक्रमी वाढ,गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट दरवाढ
सर्वसामान्यांच्या जेवणात महत्वाच्या घटक असलेल्या मिरचीच्या दरात मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी दुप्पट दरवाढ झाली असून देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीचे बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ओल्या लाल मिरचीला आज पर्यंतच्या सर्वाधिक ६ हजार पासून १२ हजार पर्यंत दर मिळत आसल्याने चटणीचा दर ही दुप्पट होणार आहे.गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मिरचीवर घुबडा रोगासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने लाल मिरचीच्या आवक वर परिणाम झाला आहे त्यामुळे मिरचीची आवक कमी झाल्याने भाव मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव दुप्पट वाढले आहे.नंदुरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो दरवर्षी नंदुरबार जिल्ह्यात लाखो क्विंटल मिरची आवक होत असते. यावर्षी बाजार समितीत आतापर्यंत 30 हजार क्विंटल हून अधिक मिरची ची खरेदी झाली असून. बाजार समितीत ओल्या मिरचीचे दर सरासरी प्रतिक्विंटल ८ हजारावर गेले आहेत. तर सर्वाधिक दर यंदा १२ हजार रुपये देण्यात आला आहे. त्यामुळे दररोज 100 ते 150 वाहनातून हजारो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे. तर ओल्या लाल मिरचीला अजून भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे मिरची पिकावर घुबडा जातीचा रोग आला यामुळे मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले असल्याने उत्पादन कमी झाले आहे .या हंगामात आठ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आली होती मागील वर्षे देखील मिरचीला चांगला भाव मिळाला होतं या वर्षी देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा करण्यात आली होती ही अपेक्षा मात्र चांगला भाव मिळून देखील शेतकऱ्यांमध्ये असमाधानीच्या वातावरण दिसून येत आहे. बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक वाढत असली तरी दर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांमुळे मिरचीचे उत्पादनही घटले असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही अशी शंका असल्याने शेतकऱ्यांची अवस्था कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.