भारत जोडो यात्रेसाठी घेतली नवीन ॲम्बुलन्स
भारत जोडो यात्रेसाठी घेतली नवीन ॲम्बुलन्स
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काही दिवसात महाराष्ट्र राज्यात येणार असून,काँग्रेस पक्षाचे नेते आतापासूनच तयारीला लागले आहेत.काही जण चालण्याची सवय करत असून,काही व्यायाम करून फिटनेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र रायगड जिल्ह्याचे नवी मुंबईतील नेते महेंद्र घरत यांनी या यात्रेसाठी नवीन ॲम्बुलन्स खरेदी केली असून,ही ॲम्बुलन्स जोपर्यंत यात्रा महाराष्ट्रात फिरेल तो पर्यंत ती यात्रे सोबत असणार आहे.त्यानंतर ही ॲम्बुलन्स जनतेसाठी अर्पण केली जाणार असून या ॲम्बुलन्स मध्ये अनेक प्रकारची औषधे ठेवली जाणार आहेत जी यात्रेत सामील कार्यकर्त्यांना काही दुखापत अथवा आरोग्य विषयी काही अडचण आल्यास तात्काळ याच्यावर उपचार केले जातील.आज या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.
त्यामुळे एक आगळा वेगळा उपक्रम रायगड काँग्रेस पक्षाने केल्याचे दिसत आहे..