बातम्यामहाराष्ट्र

सन्मान प्रेस्टीज ऑफीस, वजिराबाद येथील घरफोडीचा उलगडा; दोन आरोपीसह नगदी 17,41,400/- रुपये जप्त

सन्मान प्रेस्टीज ऑफीस, वजिराबाद येथील घरफोडीचा उलगडा; दोन आरोपीसह नगदी 17,41,400/- रुपये जप्त

दिनांक 30/10/2022 रोजी चे रात्री सन्मान प्रेस्टीज, वजीराबाद, नांदेड येथील ऑफीस मध्ये बाथरुचे खिडकीतुन आत प्रवेश करुन अज्ञात आरोपीतांनी नगदी 22,15,470/- रुपये चोरी केली होती त्यावरुन फिर्यादी नंदकुमार जळबाजी गाजुलवार, रा. चौफाळा नांदेड यांचे फिर्यादीवरुन पो.स्टे. – वजीराबाद गु.र.नं. 377/2022 कलम 457, 380 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी शोध अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या पथकाने घटनास्थळ व आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज हस्तगत करुन त्याचे अॅनालीसीस करुन तसेच गुप्त बातमीदारांना नेमुण अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना आज रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, सन्मान प्रेस्टीज ऑफीस, वजीराबाद, नांदेड येथे घर फोडी करणारे आरोपी मुदखेड येथे असल्याबाबत माहिती मिळाल्यावरुन पो. नि. स्थागुशा यांनी तशी माहीती मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्याने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी श्री व्दारकादास चिखलीकर यांना पथक तात्काळ रवाना करण्याबाबत आदेशीत केले. पो नि स्थागुशा यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमलदार यांना रवाना केले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्तदाराच्या बातमी प्रमाणे मुदखेड रेल्वेस्टेशन परीसरात जावून संशईत आरोपींचा शोध घेवून रेल्वे स्टेशन परीसरातुन आरोप नामे 1) शिवदास पुरभाजी सोनटक्के, वय 21 वर्ष, रा. बागमार गल्ली, मुदखेड, जिल्हा नांदेड 2) अंकुश पांडूरंग मोगले, वय 20 वर्ष रा. धनगरगल्ली, मुदखेड, जिल्हा नांदेड हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले. गुन्ह्यातील मुद्देमालासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी चोरलेली रक्कम त्यांच्या घरी मौजे मुदखेड येथे असल्याचे सांगीतल्याने आरोपी क्रमांक 1 याचे कडुन 13,41,400/- रुपये व आरोपी क्रमांक 2 यांचे कडुन 4,00,000/- रुपये नगदी असा एकुण 17,41,400/- रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना गुन्हयातील रक्कमेसह पुढील तपासकामी पोलीस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात देण्यात आले असुन नमुद आरोपीतांकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु, सपोउपनि / संयज केंद्रे, पोहेकॉ गुंडेराव करले, गंगाधर कदम, शंकर म्हैसनवाड, सखाराम नवघरे पो ना/ अफजल पठाण, विठल शेळके, पो कॉ देविदास चव्हाण, तानाजी येळगे, गणेश धुमाळ, चालक पोकों / कलीम, हेमंत बिचकेवार, महिला पोह / पंचफुला फुलारी सायबर सेल चे पोह/ दिपक ओढणे, राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button