राहुलजी गांधींच्या नेतृत्वाबाबत मल्लिकार्जुन खर्गेंचे विधान स्वागतार्ह !: नसीम खान
केंद्रात गैर-भाजपा सरकार काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधीच देऊ शकतात.
मुंबई, दि. २ नोव्हेंबर :-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली गैर-भाजपा सरकार स्थापन होईल असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी हैदराबादच्या जाहीर सभेत केलेल्या विधानाचे माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी स्वागत केले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. राहुलजी गांधी हे नेतृत्व करण्यास सक्षम असून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देण्याची ताकद देशात फक्त राहुलजी गांधी यांच्यामध्येच आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाब विचारण्यास घाबरत असताना राहुलजी गांधी मोदी सरकारला सातत्याने जाब विचारत आहेत. बेरोजगारी, महागाई, अर्थव्यवस्था, चीनी आक्रमण, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी राहुलजी गांधी लढा देत आहेत. देशातील जनतेचा राहुलजी गांधीवरील विश्वास वाढलेला आहे. देशातील लोकशाही, संविधान व राष्ट्रीय एकात्मता वाचविण्याचे काम फक्त काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते असा दृढ विश्वास जनतेला आहे.
काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना अनुभवी पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणार पक्ष आहे. लोकशाही व संविधानाला मानणारा पक्ष आहे. देशभरात काँग्रेसचे कार्यकर्तो मोठ्या संख्येने असून काँग्रेस विचारधारा माननारे आहेत. राहुलजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेने देशाचे वातावरण बदलले आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे असे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात सुद्धा २०२४ ला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वासही नसीम खान यांनी व्यक्त केला.