बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन

बुलढाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आला आहे. यानिमित्ताने एकता दौडचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे करण्यात आले होते..यावेळी एकतेची शपथ घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड ,आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते,जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर तसेच शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू, पदाधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच नागरिकांनी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button