वेगवेगळ्या भाषेतुन प्रेम पत्रांचा संग्रह करणारा अवलिया
वेगवेगळ्या भाषेतुन प्रेम पत्रांचा संग्रह करणारा अवलिया
आपल्यापैकी प्रत्येकाला कुठला कुठला छंद असतो कुणाला वाचनाचा, कुणाला फिरण्याचा, तर कुणाला चलनातील विविध नाणी गोळा करण्याचा मात्र वाशिम जिल्ह्यातील गोपाल खाडे यांनी चक्क प्रेम पत्रांचा संग्रह केला असून धुळ्यात भरलेल्या अखिल भारतीय साठाव्या अंकुर साहित्य संमेलनात हे प्रेम पत्रांचे प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे, पाहूया गोपाल खाडे यांनी जोपासलेला या छंदाची विशेष बातमी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या माध्यमातून.
धुळे शहरातील शाहू महाराज नाट्य मंदिरात दोन दिवशी अखिल भारतीय साठव्य अंकुर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत मात्र यासोबतच या साहित्य संमेलन सगळ्यात चर्चा आहे ती प्रेम पत्रांच्या प्रदर्शनाची वाशिम जिल्ह्यातील गोपाल खाडे यांनी प्रेम पत्रांचा संग्रह केला असून या संग्रहात विविध प्रेम पत्रांचा समावेश आहे. यात शेतकरी भावाला लिहिलेलं बहिणीचे पत्र किंवा प्रेयसीने लिहिलेलं प्रियकराला पत्र, अशी एक ना अनेक प्रेम पत्रे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळपास 22 भाषांमधील प्रेमपत्र या ठिकाणी असून गोपाल खाडे यांनी आतापर्यंत 500 हुन अधिक प्रेम पत्रांचा संग्रह केला आहे.
यासोबतच विविध भाषेतील प्रेम पत्रांचा देखील यात समावेश असून साहित्य संमेलनात येणाऱ्या प्रत्येक रसिकांची पावले या प्रदर्शनाच्या ठिकाणी हमखास थांबतात आणि प्रत्येक जण या प्रदर्शनातून प्रेमाच्या वेगवेगळ्या भाषांचा आस्वाद घेत साहित्य संमेलनाचा आनंद घेत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रेम पत्रांचा संग्रह करीत असून ही अनोखी संकल्पना गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या मनात आली आणि त्यातून आम्हा प्रेमपत्रांच्या संग्रहाचा प्रवास सुरू झाला असल्याचे गोपाल खाडे यांनी सांगितले.
BYTE : गोपाल खाडे