एका एकरात घेतले 50 क्विंटल झेंडूचे उत्पन्न ; दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांने फुलवले झेंडूचे रान
एका एकरात घेतले 50 क्विंटल झेंडूचे उत्पन्न ; दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांने फुलवले झेंडूचे रान
दिग्रस तालुक्यातील शंकर नगर (डोळंबा) शिवारात श्रीकृष्ण सोनटक्के या शेतकऱ्यांने पारंपरिक शेती ला बगल देत फुलवले झेंडूचे रान फुलवले. यवतमाळ जिल्ह्यात 9 महिण्यात जवळपास 200 च्या वर शेतकरी आत्महत्या झाल्या असून शेतकऱ्या ला मूलभूत गरजा भागवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. कापूस , सोयाबीन ,ज्वारी पिकाचे उत्पन्न कमी होत असल्याने व भाव व्यवस्थित मिळत नसल्याने या पारंपरिक पिकाला डावलून श्रीकृष्ण सोनटक्के या युवा शेतकऱ्यांने झेंडूच्या फुलांची सुंदर शेती केली. दसरा दिवाळी ला 70 ते 80 रु किलो प्रमाणे झेंडू फुलांची ची विक्री करून एका एकरात 50 क्विंटल च्या वर उत्पन्न घेतले आहे,विशेष म्हणजे त्यांच्या कडे शेती नसताना सुनील पारधी यांच्या कडून शेती भाडे तत्त्वावर घेऊन पीक काढले आहे.
बाईट – श्रीकृष्ण सोनटक्के, शेतकरी
बाईट – विष्णू उकंडे, सामाजिक कार्यकर्ते