राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नागपूरात सी आर पी एफ च्या वतीने काढण्यात आली सायकल रैली
राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नागपूरात सी आर पी एफ च्या वतीने काढण्यात आली सायकल रैली
३१ ऑक्टोबर, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यांच्या जन्म दिनाच्या औचित्य निमित्त नागपूरात केंद्रीय रिजर्व पोलीस बल (CRPF) नागपुरच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.CRPF नागपुर कॅम्प ते स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी पर्यंत ही सायकल रैली काढण्यात आलेली होती. केंद्रीय रिजर्व पोलीस बल नागपूर केंद्राचे पुलीस उपमहानिरीक्षक, पी.आर. जम्भोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रैली काढण्यात आली. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदाना विषयी जनजागृती करण्यात साठी आणि एकतेचा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी सायकल रॅलीत सहभागी जवानांनी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा दिल्या.
बाईट – पी.आर.जम्भोलकर,पोलीस उपमहानिरीक्षक,केंद्रीय रिजर्व पोलीस बल नागपूर