बसच्या मागील टायरखाली आलेल्या ७२ वर्षीय मृत्यु
बसच्या मागील टायरखाली आलेल्या ७२ वर्षीय मृत्यु
बसच्या मागील टायरखाली आलेल्या ७२ वर्षीय महिलेला चिरडल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी बेस्ट बस चालकाला अटक केली आहे. मालिनी ताऊ सादये (७२) असे मृत महिलेचे नाव असून, ती दररोज सकाळी कुर्ला डेपोजवळ फिरायला जाते. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ती फिरायला निघाली आणि घरी परत आलीच नाही. म्हणून तिच्या मुलीने कुर्ला बेस्ट डेपोजवळ चौकशी केली असता तिला अपघात झाल्याचे समजले. जिथे तिची आई 310 क्रमांकाच्या डबल डेकर बसच्या मागच्या टायरखाली येऊन जखमी झाल्याचे समजले. व तिच्या आईला सायन रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली. कुर्ला डेपो परिसरातून बस सुटत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला टायरखाली झोपलेली दिसत आहे. महिला टायरखाली कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत. बसमधील कंडक्टरने सर्व बाजू तपासल्या आणि बस पुढे नेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. मात्र बस सुरू होताच महिलेचा मागच्या डाव्या टायरखाली चिरडला गेला. प्रवाशांनी आरडाओरड करून बस थांबवली आणि महिलेला सायन रुग्णालयात हलवले असता तिला मृत घोषित करण्यात आले.कुर्ला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ आणि 279 नुसार गुन्हा दाखल केला आहे.आरोपी बेस्ट बस चालक महेश लक्ष्मण गाडीलकर (४६) याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे